KKR vs RCB IPL 2023: KKR ने IPL 2023 मध्ये आपला आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यांनी आपल्या घरच्या मैदनवर म्हणजे इडन गार्डन्स स्टेडियमवर RCB विरुद्ध विजय मिळवला आहे. कोलकाताने बँगलोरवर 81 धावांनी विजय मिळवला. या मॅचमध्ये बँगलोरची बॅटिंग पूर्णपणे फ्लॉप ठरली. कॅप्टन फाफ डु प्लेसी आणि विराट कोहलीची बॅटिंग एवढी विशेष चालली नाही. केकेआरचा मालक शाहरुख खानसोबत विराट कोहलीच्या फुटवर्कने धमाल केली.
टॉस जिंकल्यानंतर कोलकाताने या मॅचमध्ये आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 7 विकेट गमावून 204 धावा केल्या. बँगलोरची टीम 17.4 ओव्हर्समध्ये 123 रन्सवर ऑलआऊट झाली. या मॅचनंतर दोन्ही टीम्सच्या प्लेयर्समध्ये जुगलबंदी पहायला मिळाली. यावेळी कोहली आणि शाहरुखच्या जोडीने जे काम केलं, ते कोणीच करु शकलं नाही.
मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम्सचे खेळाडू एकमेकांबरोबर चर्चा करत करत असतांना दरम्यान कोलकाता टीमचा मालक शाहरुख खानने विराट कोहलीची भेट घेतली. कोहलीला पाहताच शाहरुख खान त्याच्या दिशेने धावत गेला व त्याची गळाभेट घेतली. त्यानंतर काहीवेळ दोघे बोलले.
KKR vs RCB IPL 2023 या मतच मध्ये विराट कोहलीच्या पायाला दुखापत झाली होती. शाहरुख खानने संभवत: त्याच दुखापतीबद्दल विचारपूस केली. कोहली शाहरुख खानला भेटला, त्यावेळी कोहलीच्या पायावर पट्टी बांधलेली होती. शाहरुखने कोहलीला पठाण चित्रपटातील गाण्यावर काही स्टेप्स करायला सांगितल्या.
शाहरुखने शिकवलं, त्या प्रमाणे कोहलीने हळूहळू स्टेप्स केल्या. कोहलीने प्रयत्न केला व एक-दोनवेळा आपला पाय उचलला. त्यानंतर कोहली आणि शाहरुख दोघेही हसायला लागले. दोघे काहीवेळ बोलले. सोशल मीडियावर कोहली आणि शाहरुखचा व्हिडिओ व्हायरल होतोय.