IPL 2023 David Warner: गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर, साई सुदर्शनच्या नाबाद 62 धावांच्या समंजस खेळीमुळे गतविजेत्या गुजरात टायटन्सने मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग टी-20 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) रणनीतीची बरीच चर्चा होत आहे. वास्तविक पाहता चाहते वॉर्नरच्या रणनीतीवर टीका करत आहेत.
तुम्हाला सांगू इच्छितो की गुजरातच्या इनिंग दरम्यान अक्षर पटेलला (Axer Patel on Devid Warner) बॉलिंग करायला लावले नाही, ज्यामुळे चाहते नाराज आहेत. अशा स्थितीत, सामन्यानंतर वॉर्नरने या रणनीतीवर आपले मत मांडले आणि अक्षर पटेलला का बॉलिंग दिली नाही हे सांगितले.
वॉर्नर म्हणाला, ‘हे खेळपट्टीमुळे झाले. या खेळपट्टीवर कुलदीप अधिक प्रभावी ठरेल असे आम्हाला वाटले. याशिवाय आमच्याकडे मार्शही होता.त्यामुळेच अक्षर ला बॉलिंग दिली गेली नाही.
यासोबतच दिल्लीचा कर्णधार वॉर्नर म्हणाला, ‘खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त हवेत फिरत होता. अशा स्थितीत कशी फलंदाजी करायची हे गुजरातने दाखवून दिले आहे. दिल्लीच्या मैदानावर आमचे आणखी 6 सामने आहेत, आम्ही येथून शिकू आणि पुढे जाऊ.