इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ची सुरुवात धमाकेदार झाली. शुक्रवारी (३१ मार्च) खेळल्या गेलेल्या सीजन मधील सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. सीएसकेचा गुजरात टायटन्सविरुद्धचा हा सलग तिसरा पराभव आहे. गेल्या सीजन मध्ये सीएसकेने गुजरातविरुद्धचे दोन्ही सामने गमावले होते.
बघितले तर सामन्याच्या पहिल्या दिवशी बरीच मज्जा आली. सुरूवातीला आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी झाला ज्यामध्ये स्टार्स पाहायला मिळाले. त्यानंतर सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी शानदार कामगिरी करत नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित सुमारे एक लाख प्रेक्षकांना खूश केले.
आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी, उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये बॉलीवूड स्टार्सनी उत्कृष्ट कामगिरी केली. सर्वप्रथम बॉलीवूड गायक अभिजीत सिंगने पठाणसह अनेक चित्रपटांतील गाणी गाऊन वातावरण प्रसन्न केले. यानंतर तमन्ना भाटियाने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देत चाहत्यांना नाचायला भाग पाडले. नंतर पुष्पा चित्रपटाची नायिका रश्मिका मंदान्ना प्रेक्षकांना बघायला मिळाली. रश्मिकाने ऑस्कर विजेते नाटू-नाटू या गाण्यावर परफॉर्म करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
उद्घाटन समारंभात CSK कर्णधार एमएस धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या दिसले. दोन्ही कर्णधार खास रथावर स्वार होऊन मंचावर आले. नंतर दोन्ही कर्णधारांनी ट्रॉफीसोबत पोजही दिल्या.