IPL 2023 Breaking News Marathi: क्रिकेट विश्वातून नुकताच मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामदारम्यान टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला गूडन्युज मिळाली आहे. भारताच्या या खेळाडू कडे कॅप्ट्न्सीची जबाबदारी आली आहे.
आयपीएल 16 व्या सीजन ची सुरुवात दणक्यात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये युवा खेळाडूंनी आपली मोठी छाप सोडली आहे. या हंगामात पुन्हा एकदा सर्व संघ आपल्या होम ग्राउंडमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या टीमला घरच्या मैदानावरच चिअरअप करता येणार आहे. एका बाजूला आयपीएलसाठी मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या टिमच्या एका अनुभवी खेळाडूला आयपीएलदरम्यान मोठी गूड न्यूज मिळाली आहे.
या अनुभवी फलंदाजाने टीम इंडियाकडून नुकताच 100 वा कसोटी सामना खेळला होता. या अनुभवी भारतीय क्रिकेटरने टीम इंडिया अडचणीत असताना सावरून एक हाती सामना जिंकून दिला होता या खेळाडूला टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार म्हणूनही ओळखलं जातं. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आहे. पुजाराची भारताच्या टिमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ट्विटद्वारे मिळाली आहे.
चेतेश्वर पुजारा इंग्लंडला गेला आहे. तिथे तो काउंटी चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणार आहे. या काउंटी चॅम्पियनशीपला आजपासून म्हणजे 6 एप्रिल 2023 पासून सुरुवात होत आहे. पुजारा याला ससेक्स काउंटी टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. पुजारा आयपीएल 2023 मध्ये सहभागी नाही. पुजाराने या संधीचा फायदा घेत काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. पुजाराचा हा निर्णय टीम इंडियासाठी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फायदेशीर ठरु शकतो.