IPL 2023 मध्ये आता 11 ऐवजी 12 खेळाडू असतील, 5 नवीन नियमामुळे क्रिकेट पूर्णपने बदलेल पहा नवीन नियम काय आहे, IPL 2023 New Rule

IPL 2023 New Rule: मित्रांनो बहुप्रतिक्षित IPL 2023 ची प्रतीक्षा संपली आहे. IPL 2023 च्या 16व्या हंगामातील पहिला सामना काल 31 मार्च रोजी झाला आहे. यंदाच आयपीएल 2023 खूप खास असणार आहे, कारण यावेळी अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन कोणते नियम लागू झाले आणि हे नियम काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत. विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यन्त वाचावी.

इंपैक्ट प्लेयर नियम

IPL 2023 मधील सर्वात महत्त्वाचा Impact Player नियम. याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. सामन्यादरम्यान प्रत्येक संघ कोणताही एक खेळाडू बदलू शकतो. जर समजा एखाद्या संघाने चार परदेशी खेळाडूंचा समावेश केला असेल तर ते परदेशी खेळाडूंचा Impact Player म्हणून वापर करू शकणार नाहीत. अशा स्थितीत त्याला परदेशी खेळाडूला मैदानाबाहेर पाठवावे लागणार आहे. या नियमांनुसार, 14 व्या षटकाच्या आधी Impact Player ला घेतले जाऊ शकते. इम्पॅक्ट प्लेअर आल्यानंतर मैदान सोडणारा खेळाडू सामन्यात परत येणार नाही.

टॉस नंतर सांगावे लागतील 11 खेळाडू

आतापर्यंत कर्णधारांनी टॉस करण्यापूर्वी 11 खेळाडू मध्ये कोण कोण समाविष्ट आहे हे सांगावे असा नियम होता. पण आता टॉसनंतर कर्णधार आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करणार आहे. टॉस च्या आधारावर कप्तान 11 खेळाडूची नेमणूक करेल.

वाइड-नो बॉल साठी होणार DRS

नुकत्याच संपलेल्या महिला प्रीमियर लीगमध्ये संघ वाइड आणि नो बॉलसाठी डीआरएस वापरत होते. आता हा नियम आयपीएलमध्येही लागू होणार आहे. पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्यास, फलंदाजी आणि गोलंदाजी संघ वाईड किंवा नो बॉलसाठी डीआरएस घेऊ शकतो.

अनफेयर मूवमेंट वर करावी लागेल डेड बॉल

IPL 2023 मधील सामन्यादरम्यान, यष्टीरक्षकासह संघातील कोणत्याही खेळाडूने चेंडू टाकण्यापूर्वी अनुचित हालचाली केल्या, तर Dead बॉल म्हणून घोषित केला जाईल. अशा स्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघालाही पेनल्टी म्हणून 5 धावा दिल्या जातील.

स्लो ओवर रेट मॅचमध्ये शिक्षा दिली जाईल

आयपीएलमध्ये स्लोओव्हर रेटची अनेकदा चर्चा होते. पण यावेळी जर एखाद्या संघाने असे केले तर त्याला सामन्यादरम्यानच शिक्षा होईल. आंतरराष्ट्रीय T20 सामन्याप्रमाणे, कट ऑफ वेळेनंतर टाकल्या जाणार्‍या षटकांच्या संख्येत फक्त चार खेळाडू सीमारेषेवर उपस्थित असतील. तसे, पॉवरप्लेनंतर, कर्णधार 5 खेळाडूंना सीमारेषेवर ठेवू शकतो.

Leave a Comment