DC vs GT: मित्रांनो, IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचे संघ आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. (IPL Breaking News in Marathi)
IPL 2023 चा सातवा सामना आज म्हणजे 4 एप्रिल 2023 ला दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा पहिला सामना हरल्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा संघाची या सामन्यात पलटवार करण्याची इच्छा राहणार आहे. त्याचवेळी, सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जवर 5 गडी राखून विजय नोंदवणाऱ्या हार्दिक पांड्याच्या संघाला आपली विजयी मोहीम सुरू ठेवायची आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच आयपीएलचा सामना दिल्लीत होणार आहे.
गुजरात टायटन्सचा संघ चॅम्पियन आहे यात तर काही शंकाच नाही. 31 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या IPL 2023 च्या सलामीच्या सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला होता. CSK च्या संघाने १७१ धावा करून हा सामना हातातून गमावला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल आणि राशिद खान यांनी अप्रतिम कामगिरी केली. शुभमनने फलंदाजीत अर्धशतक झळकावले होते, तर रशीद खानने गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. CSK विरुद्धच्या विजयानंतर गुजरात टायटन्सचा उत्साह आता वाढलेला दिसत आहे. अशा स्थितीत दिल्ली संघाला सावध राहावे लागणार आहे. कारण गुजरातविरुद्ध (Gujarat Titans) दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नाही. (Ipl 2023 Breaking News in Marathi)
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील Gujarat Titans संघाचा आयपीएलमध्ये फार जुना इतिहास नाही. Indian Premier League 2022 मध्ये गुजरात टायटन्सने दार ठोठावले होते. पहिल्याच वर्षी इंडियन प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावण्यात या संघाला यश आले होते. आयपीएलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गुजरातसमोर दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नाही. आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला आहे. आयपीएल 2022 मध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.