मित्रांनो IPL 2023 मध्ये हार्दिक पांड्याच्या गुजरात टाइटन्स टीम ला खूप मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण IPL 2023 मधून बाहेर पडला आहे.
आयपीएलची सुरुवात शुक्रवारी (31 मार्च) एका शानदार उद्घाटन सोहळ्याने झाली. यानंतर मोसमातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यात केन विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो IPL 2023 मधून बाहेर पडला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गुजरात टाइटन्स ने केन विलियमसन ला 2023 च्या मिनी ऑक्शन मध्ये 2 कोटी रुपयाची बोली लावून खरेदी केले होते.
सामना सुरू असतांना चेन्नई सुपर किंग्जच्या डावाच्या 13 व्या षटकात ही घटना घडली. या षटकात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने हवाई शॉट खेळला, ज्यावर विल्यमसनने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेवर हवेत उडी मारूनही विल्यमसनला कॅच घेता आली नाही आणि तो खाली पडला व त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याला तत्काल मैदांनातून बाहेर नेण्यात आले. आणि त्याच्या जागेवर साई सुदर्शन ला खेळण्याची संधि मिळाली.
गुजरात ने 5 विकेट ने मॅच जिंकली
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने 7 बाद 178 धावा केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा केल्या. त्याच्या खेळीत त्याने 9 षटकार आणि 4 चौकार मारले. तर मोईन अलीने 23 आणि शिवम दुबेने 19 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले.
179 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना गुजरात संघाने चार चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. शुभमन गिलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने 27 आणि ऋद्धिमान साहाने 25 धावा केल्या आणि रशीद खान सामनावीर ठरला.