KKR vs RCB Playing 11 IPL 2023: जवळपास चार वर्षांनंतर KKR संघ त्यांच्या घरी म्हणजे कोलकत्त्याला सामना खेळणार असून यादरम्यान संघाचा मालक शाहरुख खानही उपस्थित राहू शकतो. KKR ने त्यांचा शेवटचा सामना 28 एप्रिल 2019 रोजी ईडन गार्डन्सवर खेळला ज्यात त्यांनी मुंबई इंडियन्सचा 34 धावांनी पराभव केला होता.
दोन वेळेस IPL जिंकलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला आज IPL सामन्यात फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे कडवे आव्हान असेल. कोलकाता आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संतुलित संघ तयार करण्यासाठी धडपडत आहे, परंतु या सामन्यात त्यांना परिस्थितीचा फायदा घेऊन विजयी मार्गावर परतायचे आहे. केकेआरची या हंगामात खराब सुरुवात झाली आहे. या संघाला मोहालीत पंजाब किंग्जकडून सलामीचा सामना सात धावांनी गमवावा लागला होता.
संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बांगलादेशचा शाकिब अल हसन कौटुंबिक कारणांमुळे आयपीएलच्या चालू हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्याशिवाय संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरलाही पाठीच्या दुखापतीचे ऑपरेशन करावे लागणार असल्याने तो खेळू शकणार नाही. केकेआरचे नेतृत्व नितीश राणा (Nitish Rana) करत आहेत परंतु फ्रँचायझीला अपेक्षा होती की अय्यर हंगामाच्या मध्यभागी संघात सामील होईल, परंतु असे होतांना दिसत नाही.