‘इम्पॅक्ट फ्लेअर, स्टोक्सचा फ्लॉप शो’ गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स च्या पराभवाची ही आहेत 5 कारणे: GT vs CSK Ipl 2023

मित्रांनो, IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेट्सने पराभव केला. सीएसकेचा गुजरातविरुद्धचा हा सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पराभवामागे अनेक कारणे होती. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला गुजरात टायटन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (GT vs CSK IPL 2023) चा पराभव का झाला याची 5 प्रमुख कारणे सांगणार आहोत. विनंती आहे की ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 व्या सीजन ला शुक्रवारी म्हणजे 31 मार्च ला शानदार सुरुवात झाली. या सीजन मधील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पाच विकेट्स कायम ठेऊन विजय मिळवला.

सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, त्यात गुजरातला आठ धावा करायच्या होत्या. तुषार देशपांडेच्या त्या ओवर मध्ये राहुल तेवतियाने एक षटकार आणि एक चौकार मारून विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पराभवामागे अनेक कारणे होती.

स्टोक्स-कॉनवे फ्लॉप झाले

चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने ९२ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय बाकीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. CSK साठी दुसरी सर्वोत्तम धावसंख्या मोईन अलीची होती ज्याने 23 धावा केल्या. बेन स्टोक्स, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू यांसारखे खेळाडू काहीही विशेष करू शकले नाहीत. बेन स्टोक्सकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सात धावांवर तो राशिद खानचा बळी ठरला. ऋतुराज व्यतिरिक्त इतर कोणी 40 धावा केल्या असत्या तर CSK 200 च्या जवळ पोहोचू शकले असते.

टॉस हरणे भारी पडले

या सामन्यात सीएसकेच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्याने टॉस हरली. गुजरात टायटन्सच्या डावात मैदानावर भरपूर दव असल्याने बॅटिंग करणे सोपे झाले.

इम्पॅक्ट फ्लेअर अयशस्वी

यावेळी आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट फ्लेअर नियम‘ (Impact Flayer Rule) वापरला जात आहे. गुजरात टायटन्सच्या डावादरम्यान, सीएसकेने वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला इम्पॅक्ट फ्लेअर म्हणून मैदानात उतरवले. CSK चा हा डाव फसला आणि तुषार देशपांडेने 3.2 षटकात 51 धावा दिल्या.

शुभमन गिलला ब्रेक मिळाला नाही

चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलची चमकदार कामगिरी. शुभमन गिलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. 63 धावा करून गिल बाद झाला तोपर्यंत सामना गुजरात टायटन्सच्या हातात होता.

Leave a Comment