Mitchell Marsh love story: दिल्ली कॅपिटल्सकडून IPL खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्शची प्रेमकहाणी खूपच रोमँटिक आहे. आम्ही तुम्हाला या प्लेयर च्या रोमॅंटिक लव स्टोरी बद्दल सांगणार आहोत.
IPL 2023 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघ ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शवर खूप अवलंबून आहे, कारण कर्णधार ऋषभ पंत टीम मध्ये समाविष्ट नाही आणि डेव्हिड वॉर्नर देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. अशा स्थितीत दिल्लीची मधली फळी मिचेल मार्शवर अवलंबून आहे. हा ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर जितका आक्रमक असतो, तितकाच तो मैदानाबाहेरही रोमँटिक असतो. या खेळाडूची प्रेमकहाणी देखील इतर कोणत्याही प्रेमकथेपेक्षा कमी नाही. Mitchell Marsh love story
ग्रेटा मार्क (Greta Mark) ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्शची (Mitchell Marsh) पत्नी आहे. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर, मिचेल मार्श आणि ग्रेटा मार्क यांनी 11 सप्टेंबर 2021 रोजी लग्न केले.

वयाच्या 29 व्या वर्षी एंगेजमेंट झाल्यानंतर मिशेल मार्शने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या पत्नीसोबतची एंगेजमेंट रिंग दाखवणारा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळेस त्याने लिहिले होते की हा माझा आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. मिचेल मार्शच्या या पोस्टवर अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्ससह जगभरातील अनेक खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले होते.
मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध द फार्म मार्गारेट (The Farm Margarate River) नदीजवळ ग्रेटाला प्रपोज केले. ग्रेटा मार्क द फार्म मार्गारेट नदीजवळ व्यवसाय करते.
मिशेल मार्शने रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर काही दिवसांनीच ग्रेटा मार्कशी लग्न केले. या दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमाचे संबंध होते. एंगेजमेंटपूर्वीही दोघांना अनेकवेळा लोकांनी सोबत पहिले होते. मिशेलची पत्नी ग्रेटा अनेकवेळा आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित राहून तिच्या पतीचा जयजयकार करताना दिसली आहे. Mitchell Marsh love story