मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझनचा पहिला डबल हेडर आज खेळला जाणार आहे. पहिला सामना दुपारी 3.30 पासून सुरू होईल, ज्यामध्ये पंजाब किंग्स (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ आमनेसामने असतील. अनुभवी शिखर धवन पंजाबची धुरा सांभाळेल, तर केकेआरने जखमी श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणावर विश्वास व्यक्त केला आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात आज पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ आमनेसामने असतील. या दोन्ही संघांकडे आयपीएलमध्ये नेहमीच तगडे खेळाडू असतात, परंतु मैदानावरील त्यांची कामगिरी फारशी चांगली दिसत नाही. पंजाब किंग्ज अजूनही पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे, तर केकेआरचा संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोनदा चॅम्पियन ठरला आहे.
मागच्या सीजन मध्ये 10 संघांच्या स्पर्धेत पंजाब सहाव्या आणि केकेआर सातव्या स्थानावर होता. हा सामना मोहाली येथे दुपारी 3.30 पासून सुरू होईल. या हंगामात दोन्ही संघांचे नेतृत्व नवीन कर्णधारांकडे असेल. अनुभवी शिखर धवन पंजाबची धुरा सांभाळेल, तर केकेआरने जखमी श्रेयस अय्यरच्या जागी देशांतर्गत स्टार नितीश राणावर विश्वास व्यक्त केला आहे. अशा स्थितीत नितीश यांची आज अग्निपरीक्षा होणार आहे.
पंजाबचा संघ केकेआरपेक्षा थोडा मजबूत दिसत आहे, ज्याचा फायदा मैदानावरही होईल. मात्र, संघाला इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोची उणीव भासेल. बेअरस्टो दुखापतीमुळे संपूर्ण सीजन मधून तो बाहेर आहे.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत 30 सामने झाले आहेत. यादरम्यान कोलकाताने 20 सामने जिंकले, तर पंजाबने केवळ 10 सामने जिंकले. फ्रँचायझीने बेअरस्टोच्या जागी बिग बॅश लीगमधील हंगामातील सर्वोत्तम खेळाडू मॅथ्यू शॉर्टचा समावेश केला आहे.