Rohit Sharma IPL 2023: रोहित शर्मा ने रचला मोठा इतिहास, आपल्या आयपीएल करियर मध्ये पूर्ण केले 6000 रन

Rohit Sharma IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 25 वा सामना खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना SRH च्या होम ग्राउंड राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात रोहितने आयपीएल कारकिर्दीतील ६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Rohit Sharma Complete his 6000 Runs in IPL Career
Rohit Sharma Complete his 6000 Runs in IPL Career

मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध इतिहास रचताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा आयपीएलचा चौथा खेळाडू ठरला आहे. रोहितने सामन्याच्या 2.2 षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर चौकार मारून ही कामगिरी केली. रोहितसाठी ही खूप खास कामगिरी आहे. त्याला आयपीएलचा दिग्गज कर्णधारही मानले जाते. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

रोहितपूर्वी तीन खेळाडूंनी आयपीएलमध्ये ही खास कामगिरी केली आहे. या यादीत पहिले नाव आहे आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीचे. त्याने 228 आयपीएल सामन्यांमध्ये 6844 धावा केल्या आहेत. या यादीत विराटशिवाय शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने 210 IPL सामन्यात 6476 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 166 आयपीएल सामन्यांमध्ये 6056 धावा केल्या आहेत.

Leave a Comment