IPL 2023 Breaking News: दिल्ली कैपिटल्स ला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियम वर पोहोचला ऋषभ पंत, फोटो झाला व्हायरल

Rishabh Pant in IPL: IPL 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच या संघाचा कर्णधार ऋषभ पंत अपघाताचा बळी ठरला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत बरा होत आहे. यामुळे तो क्रिकेटच्या मैदानापासून सध्या दूर आहे. ऋषभ पंत IPL 2023 च्या 16 सीजन मध्ये खेळू शकणार नाही. मात्र, ऋषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या विडियो मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा सामना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला आहे.

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आज आमनेसामने आहेत. त्याचवेळी, या सामन्यात ऋषभ पंत आपल्या टीम दिल्ली कॅपिटल्सला सपोर्ट करण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचला आहे. ऋषभ पंतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय आपल्या आवडत्या खेळाडूला बऱ्याच दिवसांनी पाहून त्याचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत.

विशेष म्हणजे आज अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याबद्दल बोलताना गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे.

Leave a Comment