KKR vs RCB IPL 2023: Shardul Thakur ची बॅटिंग तर चर्चा शाहरुख खानची, बघा फोटो मधली ती मुलगी कोण आहे

KKR vs RCB IPL 2023: ऑलराऊंडर खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि रिंकू सिंहने Rinku Singh) काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (RCB) गोलंदाजांची पुर्णपणे वाट लावली. शार्दुल आणि रिंकूच्या बॅटिंगचा शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने फारच आनंद लुटला. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये काल म्हणजे 6 एप्रिल 2023 ला इडन गार्डन वर IPL 2023 चा 9 वा सामना खेळला गेला. टॉस हरल्यानंतर केकेआरची टीम बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. KKR ने 89 धावात 5 विकेट गमावल्या होत्या.

त्यानंतर मैदानात आलेल्या रिंकू व ठाकुर ने तुफान फटकेबाजी करत RCb ची पूर्ण पणे वाट लावली. ठाकूरने 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 29 चेंडूत 63 धावा फटकावल्या. शार्दुल ठाकूरने आपल्या इनिंगमध्ये 9 चौकार तर 3 चटकार मारले. रिंकू सिंहने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. त्याने 33 चेंडूत 2 फोर आणि 3सिक्सच्या बळावर 46 धावा पटकावल्या.

इडन गार्डन्सवर काल (6 एप्रिल 2023) KKR vs RCB यांच्यात सामना झाला. ही मॅच पाहण्यासाठी किंग खानची मुलगी सुहाना खान उपस्थित होती. सुहाना खानचा ग्लॅमरस लूक टिपण्यासाठी कॅमेरा त्या दिशेला वळणं स्वाभाविकच होत. सुहानासोबत यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये अनन्या पांडे दिसत नव्हती. त्यामुळे अनन्या पांडे कुठे आहे? असा प्रश्न्ही नेटीझन्सनी विचारला. मागच्या हंगामात सुहानसोबत अनन्या पांडे दिसली होती.

या वेळी सुहाना खानसोबत प्रेक्षक स्टँडमध्ये अभिनेता संजय कपूर आणि माहीप कपूरची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) उपस्थित होती. सुहानाने या मॅचमध्ये शार्दुल आणि रिंकूच्या बॅटिंगचा पुरेपूर आनंद लुटला. दोघींनी टाळ्या वाजवत मॅचचा आनंद लुटला. टीमचा मालक शाहरुख खान सुद्धा हा सामना पाहण्यासाठी इडन गार्डन्सवर उपस्थित होता.

Leave a Comment